Wednesday, 24 August 2011
कुठे गेलेत मंत्री
आज काल सर्वत्र एकच ऐकण्यास मिळत आहे की जन लोकपाल बिल झालेच पाहिजे.अन्ना हजारे सर्व आम आदमी साठी लढत आहेत। सर्व आम आदमी सुद्धा त्यांच्या बरोबरीने चालत आहेत। ह्या सगळ्या गोष्टींवर एकही नेता का बोलू शकत नाहीत। कारन सर्वांचे हात गुंतले आहेत भ्रष्टाचारात। त्यामुळे अन्ना सांगत आहेत की आपल्या भागातील नेते मंडळींच्या घरासमोर मोर्चा नेवून त्याना जागे करा।
परन्तु एवढे करूनही एकही मंत्री किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्ति जनालोकपल बिल सम्बन्धी बोलत नाही ही शरमेची बाब आहे। माला वाटते की त्याना नहीं वाटत की भारतात भ्रष्टाचाराचा नायनाट व्हावा। आपनास या संबधी काय वाटते ते जरुर नोंदवा.
Wednesday, 17 August 2011
रेडिओ
रेडिओ ला सध्या सुगीचे दिवस आले आहे आहेत.जिकडे पहावे तिकडे रेडिओ वर गाणी ऐकली जातात.कुणी मोबाइल वर तर कुणी डी टी एच वर पण ऐकतात जरुर.ब्लॉग लिहिण्याचा मुद्दा हा की मी आणि माझा कार्य मित्र रोहित कैंटीन मध्ये चहा पित होतो, त्याने मला एका जुन्या गाण्याबद्दल माहिती विचारली की 'चश्मे बद्दूर' चित्रपटातील एक गाने 'कहा से आये बदरा' चे गायक कोण आहेत, मी त्याला सांगितले की हे गाने येसुदास व हेमंती शुक्ला ह्यानी गायले आहे.तर तो अचंबित झाला की मला कसे काय माहित आहे.तर त्याला मी सांगितले की लहान पना पासून मी रेडिओ ऐकत आलो आहे.आमच्या कड़े त्या वेळेचा नेशनल कंपनीचा रेडिओ होता.आमच्या घरी सर्वाना गाने ऐकण्याची भरी आवड त्या मूळे साहजिकच माझ्या लहान कानांवर गाणी पडत गेली व मला पण गाण्यांची आवड निर्माण झाली.जुन्या काळातील गाणी म्हणजे कानसेनांसाठी पर्वणीच.आमच्या घरी त्यावेळेस रेडिओ सीलोन ,विविध भारती,आकाशवाणी मुंबई इत्यादि ऐकले जायचे.रेडिओ सीलोन हे रात्रि फार सुन्दर गाणी लावायचे.विविध भारती वर पिटारा,हेल्लो फरमाइश,गाने नए पुराने व तिथे अमिन सयानी यांचा आवाज म्हणजे कानात कुणी तरी मध् ओतल्या सारखे वाटायचे , मुंबई आकाशवाणी वर तर कामगारांसाठी असनारा कार्यक्रम फारच सुन्दर असायचा आणि ती वेळ म्हणजे आमची शाळेत जाण्याची असायची, म्हणून खास लक्षात आहे, त्याचे ते सुन्दर संगीत सुरु झाले की शाळेची वेळ झाली असे कळायचे. लहान पणापासून असणारी सवय अजून आहे. सध्या मी राहायला पुण्यात आहे. परंतु अजूनही घरी नासिकला गेलो कि रेडिओ जरुर ऐकतो, सध्या रेडिओ मिर्ची वर रोज रात्रि पुराणी जींस व रेडिओ सिटी वर अमिन सायानी यांचा दर रविवारी असनारा कार्यक्रम जरुर ऐकतो.तर अशा आठवणी आहेत माझ्या रेडिओ सम्बन्धी त्या या कारणाने आठवल्या व लिहावे असे वाटले, आशा आहे की तुम्हला हा ब्लॉग जरुर आवडला असेल.कृपया आपले मत जरुर नोंदवा.
Monday, 8 August 2011
सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण !
सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण !
अलीकडे तिचा सारखा च एंगेज लागतोय फोन ...न्हवत होत बोलन चालन खुप त्रास व्हायचा दोन दोन दिवस आमच्या मधे अबोलाच असायचा म्हणूनच तिला घेउन दिला .... नोकियाचा फोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड बरोबर बोलतय तरी कोण मी जरा विचारल तर रुसूनच बसते दोन दोन दिवस माझ्या शी बोलनच बंद करते म्हणते कशी कस्टमर केअर चा आला होता फोन खरच का हो तिला ऐकवत असतील रिंग टोन .सांगा ना माझ्या गर्ल फ्रेण्ड बरोबर बोलतय तरी कोण पहिल फ़क्त माझ्या नंबर शिवाय कोणाचाच नंबर सेव न्हवता मेसेज चा तर तिथे आता पताच न्हवता आता तर मेमरी फुल होऊंन सिम कार्ड पण भरलेत दोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड ला मेसेज पाठवतय तरी कोंन अहो प्रतेक महिन्याच बिल मीच भरतोय जिवाला काहीच नाही खात पण तिचे लाड पुरवतोय तिच्या सुखासाठी मी काढलाय आय सी आय बँकेचा लोन अलीकडे मला दिसतोय खुप ड़ेंजेर झोन सांगा ना माझ्या गर्ल फ्रेंड सोबत बोल तय तरी कोंन अलीकडे तिचा सारखाच एंगेज लागतोय फोन अहो एंगेज लागतोय फोन
मैत्रीचा अर्थ
आभाळाकडे पाहिलं की वाटत, त्या तिथे कुठे तरी ते जमिनीला टेकलय.. पण जसं जसं जवळ जावं.. तसं तसं कळतंय की आभाळाला मर्यादा नाही ... ते अमर्याद आहे ... ... आपल्या मैत्रीचहि तसंच, .. तिचे कितीही अर्थ शोधले तरी, प्रत्येकवेळी तिचा नवा अर्थ आयुष्यात व्यापात जातो... अस काय आहे आपल्या मैत्रीत.?? जे प्रत्येक क्षणी मनाला उत्साह देत राहत.. आणि कधी कधी मनात हवीहवीशी वाटणारी हुर्हुरीही निर्माण करत... हे सार कस अमर्याद ... अनंत ... विशाल आभाळासारख !!! आपली मैत्री उतरोतर अशीच दृढ होत राहू दे.....
माझा पहिला ब्लॉग
सुरुवात कुठून आणि कशी करावी हेच कळत नाही, कारण पहिल्यांदा लिहित आहे ! पण मनातील भाव इतरां पर्यंत पोहचविण्याचा एक साधा आणि सुंदर मार्ग असल्या कारणाने मी लिहित आहे .
मनातले भाव कधी कधी काही सुचवून जातात परंतु कधी लिहिले नाही फक्त आठवणीत जपून ठेवले होते. ते आपल्या पर्यंत इथून पुढे उलगडत राहीनच .
अशी आशा करतो कि माझे पहिले लिखाण आपल्याला आवडले असेल.
मनापासून धन्यवाद माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल.
Subscribe to:
Posts (Atom)