मैत्रीचा अर्थ
आभाळाकडे पाहिलं की वाटत,
त्या तिथे कुठे तरी ते जमिनीला टेकलय..
पण जसं जसं जवळ जावं..
तसं तसं कळतंय की आभाळाला मर्यादा नाही ...
ते अमर्याद आहे ...
...
आपल्या मैत्रीचहि तसंच, ..
तिचे कितीही अर्थ शोधले तरी,
प्रत्येकवेळी तिचा नवा अर्थ आयुष्यात व्यापात जातो...
अस काय आहे आपल्या मैत्रीत.??
जे प्रत्येक क्षणी मनाला उत्साह देत राहत..
आणि कधी कधी मनात हवीहवीशी वाटणारी हुर्हुरीही निर्माण करत...
हे सार कस अमर्याद ... अनंत ...
विशाल आभाळासारख !!!
आपली मैत्री उतरोतर अशीच दृढ होत राहू दे.....
No comments:
Post a Comment