Wednesday, 17 August 2011

रेडिओ

रेडिओ ला सध्या सुगीचे दिवस आले आहे आहेत.जिकडे पहावे तिकडे रेडिओ वर गाणी ऐकली जातात.कुणी मोबाइल वर तर कुणी डी टी एच वर पण ऐकतात जरुर.ब्लॉग लिहिण्याचा मुद्दा हा की मी आणि माझा कार्य मित्र रोहित कैंटीन मध्ये चहा पित होतो, त्याने मला एका जुन्या गाण्याबद्दल माहिती विचारली की 'चश्मे बद्दूर' चित्रपटातील एक गाने 'कहा से आये बदरा' चे गायक कोण आहेत, मी त्याला सांगितले की हे गाने येसुदास व हेमंती शुक्ला ह्यानी गायले आहे.तर तो अचंबित झाला की मला कसे काय माहित आहे.तर त्याला मी सांगितले की लहान पना पासून मी रेडिओ ऐकत आलो आहे.आमच्या कड़े त्या वेळेचा नेशनल कंपनीचा रेडिओ होता.आमच्या घरी सर्वाना गाने ऐकण्याची भरी आवड त्या मूळे साहजिकच माझ्या लहान कानांवर गाणी पडत गेली व मला पण गाण्यांची आवड निर्माण झाली.जुन्या काळातील गाणी म्हणजे कानसेनांसाठी पर्वणीच.आमच्या घरी त्यावेळेस रेडिओ सीलोन ,विविध भारती,आकाशवाणी मुंबई इत्यादि ऐकले जायचे.रेडिओ सीलोन हे रात्रि फार सुन्दर गाणी लावायचे.विविध भारती वर पिटारा,हेल्लो फरमाइश,गाने नए पुराने व तिथे अमिन सयानी यांचा आवाज म्हणजे कानात कुणी तरी मध् ओतल्या सारखे वाटायचे , मुंबई आकाशवाणी वर तर कामगारांसाठी असनारा कार्यक्रम फारच सुन्दर असायचा आणि ती वेळ म्हणजे आमची शाळेत जाण्याची असायची, म्हणून खास लक्षात आहे, त्याचे ते सुन्दर संगीत सुरु झाले की शाळेची वेळ झाली असे कळायचे. लहान पणापासून असणारी सवय अजून आहे. सध्या मी राहायला पुण्यात आहे. परंतु अजूनही घरी नासिकला गेलो कि रेडिओ जरुर ऐकतो, सध्या रेडिओ मिर्ची वर रोज रात्रि पुराणी जींस व रेडिओ सिटी वर अमिन सायानी यांचा दर रविवारी असनारा कार्यक्रम जरुर ऐकतो.तर अशा आठवणी आहेत माझ्या रेडिओ सम्बन्धी त्या या कारणाने आठवल्या व लिहावे असे वाटले, आशा आहे की तुम्हला हा ब्लॉग जरुर आवडला असेल.कृपया आपले मत जरुर नोंदवा.

3 comments:

  1. chan athavani aahet redio chya....Missing purani jeans here

    ReplyDelete
  2. good one sirji.......kuch purani yaaden taja ho gayi!!!!!

    ReplyDelete
  3. yaaaaaa.....mee tooo like.....old songss a lottt......but nice article u published....

    ReplyDelete